स्वदेशी म्हणजे प्रत्येक परदेशी उत्पादनांवर बहिष्कार नाही – सरसंघचालक मोहन भागवत
नागपूर ( वृत्तसंस्था)। देशात कमतरता असणारी किंवा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसलेली केवळ असंच तंत्रज्ञान किंवा सामग्री आयात केली जाऊ शकते, स्वदेशी म्हणजे प्रत्येक परदेशी वस्तूवर बहिष्कार नव्हे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. भागवत यांनी प्रा. राजेंद्र गुप्ता यांची दोन पुस्तकं लाँच करताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आर्थिक धोरण बनलं नव्हतं. स्वातंत्र्यानंतर आपण काहीही करू शकतो असं कधी आपण समजूनच घेतलं नाही. आता प्रारंभ झाला हे चांगले आहे.
मोहन भागवत म्हणाले की स्वातंत्र्यानंतर आपल्या लोकांचे ज्ञान आणि त्यांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केलं गेलं. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या अनुभवावर आधारित ज्ञानाला वाव देणं आवश्यक आहे. ते म्हणाले की परदेशातून आपल्याकडे जे येते त्यावर आपण अवलंबून राहू नये. जर आपण हे केलं तर आपण ते अटींवर केलं पाहिजे. पुढे ते म्हणाले की, परदेशात जे आहे त्याचा बहिष्कार घालायचा नाही आहे. नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला भारताला स्वावलंबी बनवण्याचे योग्य पाऊल असल्याचं म्हटलं. अशा धोरणांमुळे भारताला आपल्या लोकांच्या संभाव्य आणि पारंपारिक ज्ञानाची जाणीव होईल, असं भागवत म्हणाले.