अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग; जाणून घ्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होताना सर्वाधिक नजर असते ती बाजारपेठेवर. यात काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं आहे, याकडे सर्वांचं लक्ष असतं. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी बर्याच दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढवल्या आहेत, तर याशिवाय, बर्याच वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या अर्थसंकल्पात मोबाइल पार्ट्समधील सूट कमी करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे मोबाइल फोन महाग झाले आहेत. चार्जरही महाग झाले आहेत. नायलॉनचे कपडे स्वस्त झाले आहेत. पॉलिस्टर कपडे स्वस्त होणार. महागड्या आणि स्वस्त वस्तूंची संपूर्ण माहिती जाणून घ्या
काय झालं महाग?
मोबाइल फोन, मोबाइल चार्जर,मोबाइल पार्ट्सवरील सूट,रत्ने,शूज आदी वस्तू महाग होणार आहेत.
या वस्तू झाल्या स्वस्त
नायलॉनचे कपडे, स्टीलची भांडी, पेंट, ड्राय क्लीनिंग, पॉलिस्टर फॅब्रिक, चांदी आदी वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
कराबाबत झाले अनेक बदल
भारतातील सर्वात कमी कॉर्पोरेट कर, निवृत्तीवेतन घेणाऱ्या वयोवृद्धांना आयटीआर भरावा लागणार नाही, लहान करदात्यांचा कर कमी होणार, ज्येष्ठ नागरिकांना आयकर माफ, कर चुकवेगिरीची जुनी प्रकरणे उघडणार, ७५ वर्षाच्या वृद्धांना आयटीआर भरावा लागणार नाही, निवृत्तीवेतनावरील उत्पन्नावर कोणताही कर नाही, गृह कर्जात सरकारी सवलत २०२२ पर्यंत राहील, अद्याप सर्वाधिक आयटीआर संग्रह, ३१ मार्च २०२२ पर्यंत स्टार्टअपवर कोणताही कर नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा