भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

फास्ट टॅग तात्काळ खरेदी करा; नाहीतर भरावा लागणार दुप्पट टोल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्ट टॅग बंधनकारक केले असून १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅग प्रणालीला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी ही फास्ट टॅगसाठी शेवटची तारीख असणार आहे.

महामार्गावरील वाहतुकी सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि वाहनांची टोल नाक्यावरील कोंडी टाळण्यासाठी देशभरात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम फास्टटॅग आवश्यक असणार आहे. फास्ट टॅगचा प्रयोग ८० ते ९० टक्के यशस्वी पार पडला आहे. १० टक्के शिल्लक आहे. सर्व टोल नाक्यावर आणि ईतर ठिकाणी फास्ट टॅग अनिवार्य आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ फास्ट टॅगची खरेदी करावी, असे आवाहन नितीश गडकरी यांनी केले आहे. यापूर्वी २ ते ३ वेळा फास्ट टॅगसाठी मुदतवाढ दिली होती. १ जानेवारीला फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते, पण त्याची मुदत वाढून १५ फेब्रुवारी केली होती.

यामुळे जर तुम्हाला नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी फास्टटॅग गरजेचे आहे. फास्टटॅग प्रणालीमुळे कॅश ट्रान्झेक्शनाच्या तुलनेत टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ बचत होणार आहे. पण जर फास्ट टॅग नसेल तर आजपासून (१५ फेब्रुवारी) तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!