भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीचीही चमक वाढली

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी चढउतार पाहायला मिळाली. सोने व चांदी या दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आता मात्र आज सकाळी सोन्याने तेजी पकडली असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

आज वायदे बाजारात सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. सोन्याची फ्युचर्स किंमत रु. ६९,८५० वाढीसह ओपन झाली. सध्या सोन्याचा वायदा ६९,८५० रुपयांच्या आसपास तर चांदीचे वायदे ८३,१०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. दुसरीकडे सराफा बाजारातही सोन्या- चांदीने तुफान तेजी धरलेली दिसत आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,२५० तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,०९० रुपये आहे. एक किलो चांदीसाठी आता ८३,१०० रुपये मोजावे लागत आहे..

जळगाव मध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,४५० रुपये त २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,३१० रुपये आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!