भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

विवाहितेवर बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो काढून तिच्या नणंदेच्या मदतीने केले व्हायलर…!            यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

फैजपूर, ता. यावल. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील एक ३६ वर्षीय विवाहित महिला शेत शिवारामध्ये शौचालयात गेली असता एका संशयित आरोपीने तिचा विनयभंग करून केळीच्या शेतात ओढत नेउन तिच्यावर बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो काढले.व ते विवस्त्र फोटो पिडीत महिलेच्याच नणंदेच्या मदतीने व्हायरल केले. फैजपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात विनोद मेढे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावामध्ये ३६ वर्षीय महिला परिवारासह रहात असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. ही महिला शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता एका शेत शिवारामध्ये शौचालयासाठी गेली होती. त्यावेळेला तिथे संशयित आरोपी विनोद दोधू मेढे हा आला. त्याने महिलेचा विनयभंग करून तिला जवळच्या केळीच्या शेतात ओढत नेले. त्या ठिकाणी तिला पूर्ण विवस्त्र करून  तिचे फोटो काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार देताच त्यानी तिच्यावर जबरीने बलात्कार केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

इतकेच नव्हे तर विनोद मेढे याने पिडीत महिलेचे विवस्त्र फोटो काढून पिडीत महिलेची नणंद  हिच्याकडे पाठवले. तिने ते फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल केले. या संदर्भात पीडित महिले ने फैजपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता विनोद दोधू मेढे याचेवर फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मैंनुद्दीन सय्यद हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!