फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री– ठाकरेकडे शिंदेंचा प्रस्ताव
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. समर्थक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले आहेत. राज्यात शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे आणि यात फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव शिंदेंकडून संजय राठोड यांच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
- सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
शिंदे यांच्या प्रत्यके हालचालींकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तात्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आहे. एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे, संजय राठोड आणि संजय बांगर या तिन नेत्यांना शिंदेंनी मुंबईतच ठेवले होते आणि त्यांनीच मद्यस्थि करत चर्चा करून आपला प्रस्ताव हा उध्दव ठाकरे यांना सांगावा असा निरोप दिला. यात महाविकास आघाडी सरकारच्या बाहेर पडून शिवसेनेने भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन करावे. यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
दिल्लीतील बड्या नेत्यांसोबत फडणवीस चर्चा करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेनेने प्रस्ताव मान्य न केल्यास शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याच्याही चर्चा होत आहे. फडणवीस दिल्लीत गेल्याने या चर्चांना अधिक जोर चढला आहे.