महाराष्ट्रराजकीय

“मैदानात उतरा आणि ठोकून काढा” देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना थेट बॅटिंग करण्याचे आदेश

पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजपच्या भरपूर जागा कमी झाल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून भाजपाने आक्रमक पवित्रा धारण करत आगामी विधानसभा निवडणुकीच्य दृष्टीने कंबर कसली आहे. एकीकडे भाजपाकडून महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनांचा मोठ्या जोमात प्रचार केला जात असताना विरोधक त्यावर टीका करत योजनांचा उलटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला प्रतिउत्तर म्हणून भाजप कडून विरोधकांच्या टीकेला ताकदीने उत्तर देण्यासाठी रणनीती आखली जात आहे.त्यात भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आदेशाची वाट न पाहता मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असे आदेशच देऊन टाकले.

आदेशाची वाट पाहू नका,मैदानात उतरा आणि ठोकून काढा
आज २१ जुलै भाजपचे पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे महाधिवेशन सुरू आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावर भाजपात अंतर्गत खल चालू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विरोधकांनी गॅस सिलिंडर च्या किमती वाढल्याच सांगतात. आम्ही २०१३ च्या किमती दाखविल्या.त्या वेळी ते गप्प बसले. असा अनेक योजनांचा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.आपल्याला प्रत्येकाला उत्तर देता येतं पण सर्वच जण आदेशाची वाट पाहतात. मी परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे त्याने करावी. आदेश विचारू नका.मैदानात उतरा.आणि ठोकून काढा. तुम्ही सगळेच मैदानात उतरले पाहिजे, बॅटिंग करा.असा आदेशच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!