भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यबुलढाणा

यात्रेत देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर आग्या मोहोळाच्या मधमाशांचा हल्ला, असंख्य भाविक जखमी

बुलढाणा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी पाहण्यास मिळाली. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव लेंडीच्या निर्मळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरलेली होती. यामुळे येथे दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते. दरम्यान भाविकांच्या जमलेल्या गर्दीतच मधमाशांनी हल्ला केला. एकदा नव्हे तर दोन वेळेस हा हल्ला केल्याने यात असंख्य भाविक जखमी झाले आहेत.

महाशिवरात्री बुधवारी उत्साहात साजरी झाली. यामुळे शिवालयांमध्ये भाविकांची दिवसभर गर्दी पाहण्यास मिळत होती. तर अनेक पुरातन अशा महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रोत्सव भरविण्यातy आलेला होता. त्यानुसारच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ते जालना रोडवरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर असलेल्या निर्मळेश्वर संस्थानवर यात्रा भरविण्यात आलेली होती. यात्रा असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आलेले होते.

दरम्यान यात्रोत्सवात भाविकांची गर्दी जमलेली असताना मंदिर परिसरातील झाडावर बसलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. यात बुधवारी सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीनच्या सुमारास असे दोनदा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात असंख्य भाविक जखमी झाले आहे. यावेळी मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात्रेत मोठा गोंधळ उडाला होता, भाविकांमध्ये देखील धावपळ उडाली होती.

मधमाश्यानी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. यातील पंधराजण गंभीर जखमी आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनाही मधमाशांनी चावे घेत जखमी केले. यावेळी मधमाशांना पांगविण्यासाठी एका टिप्परमध्ये कचरा जाळून धूर करण्यात आला. तर हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जालना येथील खासगी रुग्णालयात तर काहींवर सिंदखेडराजा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!