भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

सावित्रीच्या लेकींना शालोपयोगी साहित्य वाटप,” शिकाल तर टिकाल”-लक्ष्मणराव पाटील

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

धरणगांव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथे मोठा माळीवाडा परिसरात नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना महेंद्र (भैय्या) महाजन मित्र परिवाराने विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

महेंद्र महाजन हे निरंतर समाजकार्यात अग्रेसर असतात. “शिकाल तर टिकाल” या वाक्याला अनुसरून  शाळा सुरू व्हायच्या आधी प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, स्कूलबॅग, शूज व शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देतात. मागील लकाही दिवसांपूर्वी पिंपळे रस्त्यालगत असलेल्या तलावाचे खोलीकरण केले होते. तसेच, महेंद्र भाऊंनी कोविड १९ च्या काळात मोठा माळीवाडा परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केलेल्या होत्या. त्यांनी केलेले आर्थिक व शारीरिक योगदान विसरता येणार नाही. आपल्यापुरतेच पाहणाऱ्या काळात गरजूंची मदत करणे कठीण असते. महेंद्र भाऊंसारखे मोजकेच लोकं इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतात.  यामुळे अश्या लोकांकडून प्रेरणा मिळते. म्हणून इतरांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन प्रेरणा घेऊन अधिकाधिक सहभाग वाढवावा. याच उद्देशाने त्यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, व सर्व विद्यार्थी मित्र- मैत्रिणींना अनमोल उदाहरण देऊन “वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल”  असे प्रतिपादन विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष  लक्ष्मणराव पाटील यांनी केल.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते तर उद्घाटक माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष निलेश चौधरी, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंदनराव पाटील, जेष्ठ नागरिक तुळशीराम माळी, व्यापारी सेनेचे तालुकाप्रमुख दिनेश येवले, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नपा गटनेते विनय (पप्पू) भावे, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माळी समाजाचे पंच दशरथ बापू महाजन, विजय महाजन, पी. डी. पाटील सर, धानोराचे माजी सरपंच भगवान महाजन, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, सुरेश (बुट्या) महाजन, जितेंद्र महाजन, धर्मराज मोरे, माजी नगराध्यक्ष संजय चौधरी, हेमंत चौधरी, काँट्रॅक्टर मोहन महाजन, जगदंबा कन्स्ट्रक्शनचे वाल्मिक पाटील, भानुदास पाटील, तौसिफ पटेल, गुलाम मोमीन तसेच महात्मा फुले चौक येथील सर्व जेष्ठ सन्माननीय बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!