गिरणा नदी पात्रात तरुणाची क्रूर हत्या, परिसर हादरला
धरणगाव,जि. जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव येथून जवळच असलेल्या बांभोरी येथील गिरणा नदीच्या पात्रात आशीष प्रकाश शिरसाळे या तरूणाची डोक्यात कुऱ्हाळ मरून क्रूर हत्या झाल्याने परिसर हादरला आहे.ही घटना काल रात्री नऊ वाजता उघळकीस आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, बांभोरी येथील रहिवासी असणारा आशीष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे, वय २२ वर्ष रा.शनीपेठ, बाम्भोरी ता.धरणगाव, या युवकाची काल रात्री गिरणा नदीच्या पात्रात कोणीतरी अज्ञात इसमानी कुऱ्हालीने डोक्यात घाव घालून क्रूर हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शौचास जाण्यासाठी गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी चौकशी सुरू केली तर आशिषची क्रूर हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे. हत्या का केली व कोणी केली हे अद्याप स्पस्ट झालेले नाही. या बाबत धरणगाव पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.