भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धरणगाव

गायरान वरील बेकायदेशीर बांधकाम काढण्याच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

धरणगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। दि.20/10/2021 रोजी, धरणगांव येथील गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरण साठी असलेले गायरान आरक्षित जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान,मुंबई यांनी केलेले अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांनी दि.13/09/2021 रोजी तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपरिषद धरणगाव यांना क्र.जमीन 3/28/ईटपाल/33/18/404 अन्वये आदेश दिलेले असुन अद्याप सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने धरणगांव येथील गायरान बचाव मंच तर्फे तहसीलदार धरणगाव यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंबलबजावणी करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी मंचचे संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक अँड.राहुल पारेख,सदस्य महामंडलेश्वर 1008 ह.भ.प.भगवानदासजी महाराज यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा गायरान बचाव मंच तर्फे अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.प्रसंगी गायरान बचाव मंचचे,संयोजक-अमोल महाजन,सहसंयोजक – शिरीषकुमार बयस,अँड. राहुल पारेख, हेमंत महाजन, डिगंबर चौधरी,अँड.रामभाऊ शिंदे,भास्कर मराठे, सदस्य- महामंडलेश्वर श्री.श्री.1008 ह.भ.प.भगवानदासजी महाराज, मोहन चौधरी,दिलीप पेंढारे, महेश भावे,कमलेश तिवारी,नाना पाटील, तुकाराम पाटील, एकनाथ पाटील, अरूण महाले,अरूण चौधरी,आनंदा धनगर, नितीन बयस,अनिल माळी,राजेंद्र बागड,चंद्रकांत भावसार, रविंद्र बाविस्कर, श्रीपाद पांडे, यशवंत महाजन, घनश्याम पाटील, प्रथम सुर्यवंशी,दिपक वाघ,श्रीकांत महाजन, हर्षल चव्हाण, चेतन वाघरे,किशोर चौधरी,वासुदेव माळी,समाधान धनगर, अँड.महेंद्र चौधरी, पांडुरंग मराठे,डिगंबर माळी,निलेश महाजन, जयराम माळी,जुलाल भोई उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!