शिक्षणाधिकाऱ्यासह वरिष्ठ सहाय्यक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
धुळे.मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षक बदली प्रकरणात धुळे जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंके व वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना धुळे एसीबी पथकाने लाच घेताना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षकाचे बदलीचे प्रकरण शिक्षणाधिकाऱ्या समोर आल्या नंतर वरिस्ट सहाय्यक विजय पाटील यांच्या मध्यस्थीने शिक्षकाला लाच मागण्यात आली या बाबत शिक्षकाने नोंदविलेल्या तक्रारी वरून धुळे एसीबी ने सापळा रचला या सापळ्यात आज दि.२६ आक्टोबर गुरुवार रोजी चार वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनात धुळे एसीबी पथकाने लाच घेताना शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे व वरिस्ट सहाय्यक विजय पाटील यांना अटक केली सदरची कारवाई धुळे एसीबी चे पोलिसउपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने केली.