धुळे

देशात पुन्हा नोटबंदी होणार ; राज्यातील मोठया नेत्याच्या दाव्याने चर्चेला उधाण

धुळे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा नोटबंदी लागू होईल, असं मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते.

आगामी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे 500 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी 100 आणि 200 रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्यात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!