प्रांताधिकाऱ्यांच्या चालकासह पंटर २० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/ गौणखनिजाची वाहतूक करणारे
ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली तक्रारदार यांचे ताब्यात देणेकामि उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश देण्याचे मोबदल्यात प्रांताधिकाऱ्यांच्या चालकासह पंटरला २० हजाराची लाच घेताना नाशिक एसीबी ने अटक केली. यात मुकेश अरविंद विसपुते, वय – ३५ वर्ष, धंदा – नोकरी, शासकीय वाहन चालक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिरपूर भाग, जिल्हा- धुळे, राहणार – ७ बि, विमल नगर, शिंगावे शिवार, शिरपूर जि. धुळे व बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर, वय – ५० वर्ष, धंदा – प्लॉट खरेदी विक्री, राहणार – प्लॉट नंबर ३९, शाहू नगर, धुळे देवपूर, जि. धुळे. या खाजगी इसमास अटक केली असून ही कारवाई बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी करण्यात आली
तक्रारदार यांचा ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली वाळू या गौणखनिजाची वाहतूक करताना गौणखनिज पथक, शिरपूर यांना मिळून आला होता. सदरील ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली तक्रारदार यांचे ताब्यात देणेकामि उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश देण्याचे मोबदल्यात उपविभागीय अधिकारी, यांचेशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचा प्रभाव तक्रारदार यांच्यावर टाकून प्रांताधिकारी यांचेशी जवळीक असल्याचे सांगून दीं २६ डिसेंबर २०२३ रोजी रुपये २० हजाराची मागणी केली होती.
सदरचे प्रकरण तक्रारदराशी संबंधित असलेला खाजगी इसम नामे बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर याने शासकीय वाहन चालक मुकेश विसपुते यांचेकडे तक्रारदारास आणले असता यांच्याकडे लाचेची मागणी करून शासकीय वाहन चालक मुकेश विसपुते यांनी उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश मिळवून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली, दरम्यान, लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने नाशिक एसीबी कडे तक्रार नोंदवली होती. पडताळणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने खाजगी पंटर बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर. व शासकीय वाहन चालक मुकेश विसपुते यांचे विरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सापळा अधिकारी संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई / नितीन नेटारे, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक यांनी केली.