अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल;अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
धुळे,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरापासून जवळ असलेल्या सावळदे शिवारात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहाडी उपनगरातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७१ वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केला होता. याप्रकरणी संशयित आरोपी शांताराम शिवराम अहिरे या वृद्धाच्या विरोधात मोहाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हा संशयित आरोपी शांताराम अहिरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यात आता या घटनेचा व्हिडिओ करून तो व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.