भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

लहान मुलांमध्येही वाढतोय मधुमेह, शाळेतील ७१ विद्यार्थ्यांना प्री-डायबेटीक लक्षणे, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्य संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य वाभागाने केलेल्या तपासणीत ही माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोन शाळांमधील २४२ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थ्यांत प्री-डायबेटीक अर्थात मधुमेहपूर्व लक्षणे आढळून आल्याची धक्कादायक माहिती तपासणीतून समोर आली आहे.

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सकस आणि पौष्टिक आहार व बदलती जीवनशैली या कडे झालेले दुर्लक्ष आणि समतोल आहार, यामुळे १ ते १५ वर्षाखालील वयोगटांत मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. या आजाराकडे काळजीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून वेळीच या आजारांकडे पालकांनी लक्ष दिले नाही तर हा आजार आयुष्यभर त्याच्यासोबत रहाण्याचा धोका वाढला आहे.

हे प्रकरण जळगाव जिह्यातील असले तरी ही धोक्याची घंटा राज्यातील सर्व पालकांसाठी आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील दोन शाळांमधील २४२ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थ्यांत प्री-डायबेटीक अर्थात मधुमेहपूर्व लक्षणे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ही माहिती समोर आली आहे . अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळा आणि कन्या शाळा यामधील इयत्ता १ ते ४ थीच्या वर्गातील २४२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत धरणगावातील ७१ विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य तपासणीत बाब उघड मधुमेहपूर्व लक्षणे असल्याचे आढळून आले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आकडा मोठा असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

आहार बदलाची जनजागृती पालकांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगून आहारात बदल केल्यास प्री-डायबेटीक विद्यार्थी या संकटातून निश्चितपणे बाहेर पडतील, असा विश्वास सीईओ करणवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!