भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“मला डावलले काय आणि फेकले काय?…. काही फरक पडत नाही.. पण भुजबळ काही संपले नाही,” भुजबळांचा पक्षश्रेष्ठींना इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ.छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना त्याला दुजोरा देत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

“मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. पण भुजबळ काही संपले नाही, ” असे वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी पक्षश्रेष्ठींना इशारा दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे हे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रियाही छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!