भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

भयावह ; गंगेच्या घाटांवर कोरोना रुग्णांच्या १५० हुन अधिक मृतदेहांचा खच.

Monday To Monday NewsNetwork।

दिल्ली(वृत्तसंस्था)। देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. मे महिन्यात दररोज देशात ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमध्ये औषधं, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बऱ्याच रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नसल्यानं रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र चिता पेटत असल्याचं भीषण वास्तव समोर येत आहे. त्यातच बिहारच्या बक्सरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चौसातील महादेव घाट परिसरात मृतदेहांचा खच पडला आहे. याबद्दल प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी हात झटकले. गंगा नदीतून वाहत आलेले मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. बक्सर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर येतं. बक्सरमधून गंगा नदी वाहते. या परिसरातील घाटांवर १५० हून अधिक मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाईम्स नाऊ’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशातून कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. ‘कोरोना रुग्णांचे मृतदेह घाट परिसरात दिसून येत आहेत. भटक्या कुत्र्यांनी हे मृतदेह खाल्ल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो,’ अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. बक्सरमधील महादेव घाट परिसरात मृतदेहांचा अक्षरश: खच पडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच प्रशासनाची झोप उडाली.

महादेव घाट परिसरात ४० ते ४५ मृतदेह आढळल्याचं चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी सांगितलं. ‘महादेव घाट परिसरात आढळलेले मृतदेह स्थानिक व्यक्तींचे नाहीत. ते विविध ठिकाणांहून वाहत वाहत इथे पोहोचले आहेत. चौसामध्ये वॉचमनच्या निगराणीखाली अंत्यसंस्कार केले जात आहेत. उत्तर प्रदेशातून वाहत येणारे मृतदेह कसे थांबवायचे यासाठी आमच्याकडे कोणताही उपाय नाही,’ अशा शब्दांत कुमार यांनी हतबलता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!