भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

देशात आतापर्यंत २,७८,७१९ तर राज्यात८२ हजार ४८६ जणांचा मृत्यू ; देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ

Monday To Monday NewsNetwork।

दिल्ली/मुंबई (वृत्तसंस्था)। देशात एकाबाजूला दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला चिंतेची बाब म्हणजे कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. आज देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ६३ हजार ५३३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार ३२९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४ लाख २२ हजार ४३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात २६ हजार ६१६ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच ५१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५२ लाख ५ हजार ६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८२ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला असून ४८ लाख ७४ हजार ५८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ७८ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३३ लाख ५३ हजार ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांचे लसीकरण पार पडले आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, १७ मेपर्यंत देशात ३१ कोटी ८२ लाख ९२ हजार ८८१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल दिवसभरात १८ लाख ६९ हजार २३३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!