भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

कोरोनाची लक्षणं मात्र हिच लक्षण डेंग्युचीही असू शकतात; बदलत्या वातावरणात डेंग्यूही डोकं वर काढतोय

Monday To Monday NewsNetwork।

दिल्ली (वृत्तसंस्था)।ताप आला, सर्दी, खोकला झाला की आताच्या काळात याला कोरोनाची लक्षणं मानली जातात. मात्र, हिच लक्षण डेंग्युचीही असू शकतात. आता वातावरणात बदल व्हायला लागला आहे. त्यामुळे डेंग्यु सारखा आजाराही डोकं वर काढू शकतो. आताच्या काळात डेंग्यु देखील डोकं वर काढायला लागला आहे. मच्छरांमुळे हा आजार होतो. डोके दुखी, अंग दुखी, ताप ही या आजाराची लक्षणं आहेत.एडीस डासाच्या मादीच्या चावण्याने हा ताप येतो. 2015 ते 2019 या काळात अकट्या भारतात डेंग्युचे 6 लाख रुग्ण आढळून आले होते.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ऍड प्रिवेंश्नन च्या रिपोर्टनुसार भारत, चीन, अफ्रिका, तायवान आणि मेक्सिकोसारख्या देशांसह जगभारातल्या 100 देशांमध्ये डेंग्युचे रुग्ण आढळतात
डेंग्यु म्हणजे काय?व त्याची लक्षण काय?
द हेल्थ साईटनुसार डेंग्यु हा डासांमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन आहे. ज्यात तीव्र ताप, डोकेदुखी,अंग आणि सांधेदुखी,त्वचेर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात. एडीस डासाची मादी चावल्यामुळे हा त्रास होतो. डेंग्यु हा फ्लेविविरीडे प्रजातीतला एक व्हायरस आहे. डेंग्युचे विषाणू 10 दिवसांपेक्षा जास्त काळ जगत नाहीत,पण जास्त दुर्लक्ष केल्यास डेंग्यु हेमोरॅजिक फिव्हर किंवा डीएचएफ चे रूप धारण करू शकते. ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव किंवा ब्लड प्रेशर खाली येण्याने मृत्यू ही ओढाऊ शकतो.डेंग्यु नॉर्मल किंवा गंभीर स्वरुपाचा असतो. डेग्युचा संसर्ग झाल्यास, त्याची लक्षणं 4 ते 5 दिवसांत दिसू लागतात. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू, हाडं आणि सांध्यामध्ये वेदना, उलट्या होणे, मळमळ येणे, डोळ्यांमध्ये वेदना, त्वचेवर पुरळ उठणे, ग्लैंड्समध्ये सूज येणे अशी लक्षणं दिसतात. ओटीपोटात तीव्र वेदना, सतत उलट्या होणे, हिरड्या किंवा नाकातून रक्तस्त्राव होणे, लघवीतून रक्त येणे, किंवा उलटीत रक्त येणे,, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा जाणवणे, चिडचिडेपणा किंवा अस्वस्थता ही डेंग्युची गंभीर लक्षणं असतात.

डेंग्युची लक्षणं दिसल्यास काय कराल?
डेंग्युची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कंप्लीट ब्लड टेस्ट करा, प्लेटलेट्स काऊंटनुसार डॉक्टर उपचार सुरु करतील.डेंग्यू एनएस 1 एजीसाठी एलिसा टेस्ट करावी. या ब्लड टेस्टमध्ये व्हायरल ऍटीजेनची माहिती मिळते.सुवातीच्या लक्षणांमध्ये पीसीआर टेस्ट करावी.सीरम आयजीजी आणि आयजीएम टेस्ट करा. त्याने शरीरातील ऍन्टीबॉडीजची लेव्हल समजेल.भरपूर पाणी प्या. ओआरएस लिक्वीड प्या.जेवणाची विशेष काळजी घ्या. सूप,काढा,नारळ पाणी,डाळिंब यांचं जास्तीतजास्त सेवन करा, खिचडी आणि लापशी खा,बदलत्या हवामानात डेंग्यूपासून संरक्षण व्हावं यासाठी काळजी घ्या.घराभोवती पाणी साठू देऊ नका. कुलर मधलं पाणी बदलत रहा. पाणी झाकून ठेवा कारण डास त्या ठिकाणी अंडी घालतात.मच्छरदानीचा उपयोग करा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!