भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

दिल्लीच्या राजकारणात खळबळ ; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अटक होणार?

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ईडी ने कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. त्यामुळे आज केजरीवाल यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. दरम्यान, केजरीवाल यांना ईडी अटक करणार असल्याचा दावा आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. भाजपा आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकून पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आपच्या नेत्यांनी केला आहे.

दिल्लीच्या राजकारणात गाजत असलेल्या कथित मद्यधोरण घोटाळ्यामध्ये आम आदमी पक्ष अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. ईडीने या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. आता अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरील यांना पीएमएलए कायद्यांतर्गत समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी सीबीआयने या प्रकरणात केजरीवाल यांची चौकशी केली होती. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव आरोपी म्हणून नाही.

परंतु, आरोपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता असल्याने आपच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. आपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार स्थापन करताना कोणताही विभाग स्वतःकडे ठेवला नाही. त्यांच्याकडे आलेल्या इतर विभागांच्या फायलींवरही त्यांनी कधीही सही केली नाही. अशा परिस्थितीत दारू घोटाळ्यासाठी त्यांना थेट जबाबदार धरणे फार कठीण आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इतर आरोपींच्या जबाबाच्या आधारेच त्यांना प्रथमदर्शनी आरोपी मानले जाऊ शकते. परंतु जर पैशांच्या व्यवहारात त्यांचा कोणताही हस्तक्षेप आढळला नाही तर तर केजरीवाल यांना थेट दोषी सिद्ध करणे कठीण होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!