म्यूकोर्मिकोसिस; सूरतमध्ये
फंगल इन्फेक्शनमुळे ८ रुग्णांनी डोळे गमावले, केंद्रा ने दिले स्पष्टीकर
Monday To Monday NewsNetwork।
दिल्ली (वृत्तसंस्था)।कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवीन प्रकार आपल्या समोर आले आहेत. त्यात आता कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शनचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शनचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईनंतर आता सूरतमध्ये म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शनच्या ४० अधिक केसेस समोर आल्या आहेत. त्यातील ८ जणांना म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शनमुळे आपले डोळे काढावे लागले आहे. गुजरातमध्ये आधीच कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बेड्स,व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यात म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शनचा नवा धोका निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, म्यूकोर्मिकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे. जे नाक आणि डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पोहचते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक जण सर्दी, खोकला,डोके दुखी सारख्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही लक्षणे दिसत असतील तर म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शनची लक्षणे असू शकतात,असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचप्रमाणे २ ते ४ दिवसात हे इन्फेक्शन डोळ्यांपर्यंत पोहचू शकते. त्यानंतर २४ तासात हे इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहतचे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
व्ही.के.पॉल,निती आयोगाचे सदस्य यांनी असा दावा केला आहे की, म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन हा नैसर्गिक आजार आहे. म्यूकोर्मिकोसिस आणि कोरोना यांचा परस्परांशी विशेष संबंध नाही. ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण अधिक आहे त्यांना या संसर्गाचा धोक आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची गोष्ट नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
*म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी त्यांनी डॉक्टरांसाठी पाच उपाय सांगितले आहेत.
- *डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांच्या शरीरातील साखरेची तपासणी केली पाहिजे.
*ट्रिटमेंटमध्ये स्टिरॉइडचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.
*रुग्ण ऑक्सिजनवर असेल तर त्याला शुद्ध पाणी द्या.
*कोरोना रुग्णांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
*रुग्णांना तोंडात जर काही इंन्फेक्शन झाले असेल तर त्वरीत उपचार सुरु करा.