भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याराष्ट्रीय

यंदा मान्सून वेळेवरच !
१जूनपर्यंत केरळमध्ये धडकणार, महाराष्ट्रातही मोसमी पाऊस वेळेवर,समाधानकारक पावसाचा अंदाज

Monday To Monday NewsNetwork।

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। देशावर कोरोनाचे संकट असताना आपल्या साठी एक चांगली आणि समाधान कारक बातमी आहे. केरळात मान्सूनचे आगमन वेळेवर १ जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी हा पहिला अंदाज असल्याचे स्पष्ट केले आहे.हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत धडकणार आहे. महाराष्ट्रातही मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. देशभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. याच कालावधीत मान्सूनच्या आगमना बाबत हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येतो.या वर्षी देशात सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे. सलग दोन वर्षांपासून देशात समाधान कारक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीही हाच अंदाज आहे. 

१५ मे रोजी हवामान खात्याकडून अधिकृत अंदाज जाहीर करण्यात येणार असून, पर्जन्यमानाचा अंदाज ३१ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राजीवन यांनी दिली. मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज असल्याने आता शेतीच्या कामांनाही वेग मिळेल.ला निना आण‍ि अल निनोचा प्रभाव नसल्यामुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडेल, असेही यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजात सांगण्यात आले होते. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के प्रमाण सामान्यपेक्षा कमी, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के प्रमाण सामान्य आण‍ि १०४ ते ११० टक्के पाऊस पडल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक मानले जाते. तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान असल्यास अतिवृष्टी मानली जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!