16 वर्षां वरील नागरिकांना मिळणार फायझर (Pfizer)ची लस..!
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। भारतात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेनदीवस वाढत आहे, ही वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे गरजेचे आहे, ही जागतिक महामारी संपविण्या साठी अमेरिकेची फार्मा कंपनी फायझरने (Pfizer) त्यांची लस 16 वर्षांच्या तरुणांना देण्यात यावी यासाठी अर्ज केला आहे. ही लस फायझर आणि बायोएनटेक (BioNTech) यांनी मिळून बनवली आहे. दोन्ही कंपन्यांनी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला (FDA) 16 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींवर लशीच्या वापरासाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. यापूर्वी ही लस केवळ 18 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना देण्याची परवानगी आहे. पण, फायझरला मान्यता मिळाल्यास 16 वर्षांवरील नागरिकांना ही लस देता येईल. कॅनडाने (CANADA) फायझरची लस 16 वर्षांवरील नागरिकांना देण्यास परवानगी दिली आहे.
भारतात लसीचा तुटवडा असल्यानं फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. फायझरचे चेअरमन आणि सीईओ अल्बर्ट बूर्ला यांनी गेल्या सोमवारी सांगितलं की फायझरच्या लसीला भारतात परवानगी मिळावी, यासाठी आमची भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. फायझरने यापूर्वी एप्रिल महिन्यात भारतातील लसीकरण मोहिमेसाठी त्यांची लस मूळ किमतीत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसंच भारताला लस उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारसोबत मिळून काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.
‘फायझरला माहित आहे, की ही जागतिक महामारी संपवण्या साठी लस उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र,दोन महिन्यांपूर्वी अर्ज करूनही भारतात आमच्या लसीला मान्यता मिळालेली नाही. आम्ही सध्या भारत सरकारसोबत यांसंबधी चर्चा करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया अल्बर्ट बूर्ला यांनी दिली आहे.
फायझरवर भारतात अभ्यास न झाल्यानं परवानगी नाही . फायझरने भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती. त्यावेळी या लशीवर देशात अभ्यास न झाल्याने परवानगी नाकारली होती. मात्र, कंपनीने जगभरातील या लशीच्या प्रभाविततेच्या आधारे परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, याबद्दल भारत सरकारने कोणताच निर्णय घेतला नव्हता. भारत सरकारने लसीकरणासाठी तीन लसींना परवानगी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्युटच्या (Serum Institute of India) कोव्हिशिल्ड (COVISHEILD ) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (COVAXIN) या लशींचा समावेश आहे. तसेच नुकतंच केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik) या लशीला आपात्कालीन परिस्थितीत लसीकरणाला परवानगी दिली आहे.