भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

राष्ट्रवादीच्या महानगर जिल्हाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अजित पवार गटात खळबळ

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव शहरातील कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक सोमवारी वेळ निश्चित केला होता. मात्र वेळ निश्चित करूनही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आतापर्यंत एकाही सोमवारी कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकणे व सोडवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदेंसह २० पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे राजीनामा दिला.

महानगर जिल्हाध्यक्ष सुशिलकुमार शिंदे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातून अजित पवार गटात दाखल झाले होते. परंतु पक्षाचे जिल्ह्यातील नेते तथा मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्याला वेळ दिला नाही अशी खंत व्यक्त केली आहे. प्रत्येक सोमवारी जळगावच्या कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा झाली पण एकही सोमवारी वेळ दिला नाही.

तसेच कार्यकर्त्यांना न विचारताच जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी परस्पर नियुक्ती दिली. त्यामुळे युवक महानगर जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणीतील २० पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यात तीन उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, चिटणीस, संघटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांत खदखद सुरू होती. कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. नेतृत्वाकडून समस्या सोडवणे तर दूर पण ऐकले जात नसल्याची ओरड आहे. त्यातून शहरातील पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!