महायुतीत वाद : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महायुतीच्या सरकार मध्ये वाटप करण्यात आलेल्या मधील पालकमंत्रिपदा वरून नाराजी बाहेर आली. या नाराजी नंतर राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. १९ व जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामुळे दादा भुसे नाराज झाले होते. मात्र, या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने गिरीश महाजन यांनाही अप्रत्यक्ष धक्का बसला आहे.
पालकमंत्रीपदांच्या नियुक्तीवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव वाढल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला स्थगिती दिल्याने आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सामूहिक राजीनामे दिले. रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद न दिल्यान शिवसैनिक नाराज झालेत. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.
काय म्हटले आहे आदेशात
राज्यशासनाने काढलेल्या आदेशानुसार उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे.