अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे मानव विकास योजने अंतर्गत मुलीना सायकल वाटप
चोपडा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l चोपडा तालुक्यातील कमळगाव अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे मानव विकास योजनेतर्गत शैक्षणीक वर्षे 2023 – 24 मध्ये इयत्ता आठवीत असणाऱ्या मुलीना राजमाता , जिजाऊ मोफत सायकल गरीब मुलीना १५ आगष्ट ला मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री नानसो मधुकर चिंधु धनगर, संस्थेचे चेअरमन श्री चंद्रभान पोपटराव न्हायदे, सर्व संचालक मंडळ,तसेच माजी चेअरमन श्री डि.पी.साळुंके सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेतर्गत विद्यालयात 28 लाभार्थी विद्याथिनींना मोफत सायकलचे वाटप आज करण्यात आले यावेळी शाळेचे अध्यक्ष मधुकर चिंधु धनगर .यांच्या हस्ते श्री डि.पी.साळुंके सर माजी मुख्याध्यापक किन्ही हायस्कूल यांच्या सेवावृत्ती निमित्त शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले गावातील सायकल लाभार्थी विद्याथीनींचे पालक उपस्थित होते. सायकल मिळाल्यामुळे मुलीचा चेव्ह-यावर आनंद होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मधुकर चिंधु धनगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री डि.पी.साळूंके सर , चेअरमन श्री चंद्रभान पोपटराव न्हायदे, गोकुळ आनंदा, न्हायदे, धनराज बुधा लाडंगे, खेमचंद न्हायदे ,मान्यवर पालक वर्ग उपस्थितीत होते .
यावेळी मुख्याध्यापक श्री पी के नायदे सर यांनी प्रास्तविकात मुलीना सायकल विषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमाचे सुत्र संचलन एस एस जाधव व अर्जुन कोळी सर यांनी केले आणि विलास.पाचपोळ यांनी आभार मानले कार्यक्रम च्या यशस्वीते साठी शिक्षक व . तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी परिश्रम घेतले.