बलवाडी येथे “फॅमिली हेल्थ कार्ड” चे वाटप
बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |बलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दिनांक 23/12/2025 वार मंगळवार रोजी छत्रपती शाहू महाराज संस्थे च्या मार्फत फॅमिली हेल्थ कार्डाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी बलवाडी येथील सरपंच सौ. वैशालीताई जितेंद्र महाजन या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच उप सरपंच संजय राजाराम वाघ , ग्रामपंचायत सदस्य श्री. जितेंद्र संतोष महाजन उपस्थित राहून कार्यक्रमाची सुरवात केली.
या वाटप केलेल्या कार्ड मुळे गावातील शेतकरी, मजूरवर्ग, गरीब,गरजू नागरिकांना फॅमिली हेल्थ कार्डमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलांमध्ये कमीत कमी २०% ते जास्तीत जास्त ५०% टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यात ओपीडी, आईपीडी, ऑपरेशन, एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणी, अति दक्षता, बालरोग तज्ज्ञ, स्त्रि-रोग तज्ज्ञ, दंत रोग तज्ज्ञ, नेत्र विकार तज्ज्ञ, आदींना समाविष्ट करण्यात आले आहे. फॅमिली हेल्थ कार्डचे सभासद नोंदणी शिबिर नुकतेच बलवाडी येथे घेण्यात आले.
या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस. आरके, क्षेत्र अधिकारी सौ. सविता एस. पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सौ. मनीषा के. साळवी उपस्थित होते. तसेच गावकरी मंडळी अक्षय महाजन , संजय हरी महाजन , करण कोळी, प्रल्हाद लक्ष्मण धनगर . ग्रामपंचायत शिपाई किरण सुभाष बोरनारे व आदी उपस्थित होते .

