कृषी विभागा तर्फे राज्य पुरस्कार एकात्मिक कापूस/सोयाबीन उत्पादकता विशेष कृती योजने अंतर्गत विविध साहित्य वाटप
विरोदा,ता.यावल. मंडे टु मंडे न्युज. किरण पाटील l कृषी विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य पुरस्कार एकात्मिक कापूस/सोयाबीन उत्पादकता व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजने अंतर्गत नॅनो युरिया, नॅनो डी.ए.पी., कापूस साठवण बॅग, बॅटरी पंप वाटप कार्यक्रम दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सहाय्यक पिंपरूड, मंडळ कृषी अधिकारी, फैजपूर, तालुका कृषी अधिकारी यावल यांच्या मार्गदर्शनाखाली विरोदा ता. यावल येथे पार पडला.
सदर उपक्रमाचा २०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी महेश आगेवाल कृषी पर्यवेक्षक, फैजपूर, महेंद्र पाटील कृषी सहाय्यक विरोदा, एच पी चौधरी कृषी सहाय्यक,सरपंच जीवन तायडे विरोदा, उपसरपंच विनोद झाल्टे विरोदा, अमोल वारके, कमलाकर चौधरी, विजय चौधरी, मधुकर चौधरी, योगेश चौधरी, सुनील चौधरी, भगवान सोनवणे, सुधाकर पाटील , जितेद्र खाचणे , चंदु वारके , दिलीप पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला