जळगावप्रशासन

मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषद

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा. जिल्हा प्रशसनातर्फे सुरळीतरित्या मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असून नागरीकांनी स्वयस्फुर्तीने मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

दिनांक १८ नोव्हेंबर सोमवार रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर मतदानाच्या अंतिम तयारीत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवनसंरक्षक श्री. जमिर शेख, मनपा आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जळगांव जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजो एकुण ११ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधासभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यात ११ ठिकाणी स्ट्रॉग रुम व मतमोजणी केंद्र करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण ७ ठिकाणी आंतरराज्यीय तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातो ११ विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या विविध तपासणी नाक्यांवर व पॉलिस कारवाईत ४ कोटी ७४ लक्ष रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस दलातर्फे १ कोटी ९२ लक्ष रुपयांची देशी अवैध दारु नष्ट करण्यात आलेली आहे. जिल्हाभर १९ अवैध शस्र, १६ काडतूस, २० पेक्षा अधिक प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे. २६ लक्ष ६७ हजार ६७७ रुपयांचे अमली पदार्थ जात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंत केलेल्या कारवाईत ६ कोटी ४० लक्ष ६५९९ रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर ४ कोटी ७४ लक्ष ९७ हजार ९८८ रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये २९२१ कलम १२६ अन्यये २, कलम १२८ अन्त्रये ५५, कलम १२९ अन्वये ४१९, कलम १६३ अन्वये ३, कलम १६८ अन्वये १२७३. मुंबई दारु बंदी कायदा अन्वये ३३७, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा निर्मलन कायद्यान्वये ३ जणांवर स्थानबध्दता, मुंबई पोलिस कायदा अन्वये २ टोळ्यांची हद्दपारी कलम ५६ अन्थ्ये १४ जणांची हद्दपारी, कलम ५७ अन्वये १ गुन्हेगाराची हडपारी अशा कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आलेला असून एक पोलिस अधिक्षक, २ अप्पर पोलिस अधिकृक्षक, ८ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३३ पॉलिस निरीक्षक, १४९ सहाय्यक / पोलिस उपनिरिक्षक, २५६९ पोलिस कर्मचारी यासोबतच अपर पोलिस महासंचालक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, चाललुचपत प्रतिबंध विभाग, मुंबई रेल्वे यासह इतर विभागांकडील ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, २५ सहाय्यक / उपनिरिक्षक, १३४० पोलिस कर्मचारी, वन विभागाकडील ११७ कर्मचारी, ३००० होमगार्ड, तसेच आयटीबीपी ३ कंपनी, सीआरपीएफ ४ कंपनी, आरपीएफ २ कंपनी, एसएसबी १ कंपनी, मध्यप्रदेश पोलिस ३ कंपनी, एसआपीएफ २ कंपनी असे एकूण १४ कंपन्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. यासोबत जिल्ह्यात १२२ पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेवेळी ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात येणार आहे.

जळगांव शहर व ग्रामिण भागातील सर्व मतदान केंद्रांची साफसफाई पूर्ण करण्यात आलेली असून मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा देखिल मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या वेळी मतदारांना उद्भवणाऱ्या आरोग्याचे प्रश्न लक्षात घेवुन जिल्हाभरात २७३५ आशावर्करच्या माध्यमातुन आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत, जिल्ह्यात ३ हजार ६८३ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली असून मतदान कामकाज कामी १६ हजार ३५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाभरातील १६ मतदान केंद्रावर मोबाईल नेटकर्व नसल्यामुळे त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हाभरात २९६२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८५३ मतदारांनी गृह मतदानाचा फायदा घेतलेला आहे.

सोशल मिडिया तसेच प्रसार माध्यमांवरुन प्रकाशित होणाऱ्या मजकुराच्या प्रमाणिकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत एकूण १०९ अर्जाव्दारे जवळपास ३३६ जाहिराती प्रमाणित करुन त्यांना प्रसारित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे व माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत प्रमाणित न करता परस्पर सोशल मिडियावरील विविध माध्यमांव्दारे राजकीय व इतर मजूकर प्रसारित केल्याप्रकरणी जिल्हयातील ११ विधानसभा मतदार संघातील १२ उमेदवारांना माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या, त्यांचे खुलासे घेवून खर्च त्यांच्या उमेदवारी खर्चात दाखविण्याचे काम सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!