भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

जिल्हा उपनिबंधकास 30 लाखांची लाच घेताना अटक ; सहकार क्षेत्रात एकच खळबळ

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

नाशिक, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात एसीबीची दिवसाआड कारवाई होत असताना मात्र अधिकारी वर्ग रोजरोसपणे लाच घेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र लाच घेणाऱ्या अधिकारी वर्गाचा आलेख हा उंचावतच आहे. याला आळा बसणे महत्वाचे असताना आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकास (District Deputy Registrar) तीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 

सदरची कारवाई कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री केली लाचखोर खरे यांच्या समवेत खाजगी इस्मालाही पथकाने ताब्यात घेतले यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सतिश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१) रा. आई हाईट्स, कॉलेज रोड), adv शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.

लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.

घरझडती सुरू:
दरम्यान विभागाचे अपरधीश नारायण निहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या कॉलेज रोडवरील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!