भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीयरावेर

जिल्हा दूध संघ निवडणुक; रावेर मतदासंघातून ठकसेन पाटलांचा अर्ज ग्राह्य !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज | जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडनुकित नवे वळण आले असून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ठकसेन पाटलांचे नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरत जगदीश बढे यांचा बिनविरोध निवड रद्द केली आहे.

जिल्हा दुध संघातून रावेरमधून चिनावल येथील ठकसेन भास्कर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. याच्या विरोधात त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. तसेच यासोबत त्यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक यांच्याकडे धाव घेतली होती. यात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या निर्णयावर आक्षेप घेत आपल्याला निवडणूक लढविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. ठकसेन पाटील यांच्या अर्जावर आज सुनावणी झाली.

सुनावणीत ठकसेन पाटील यांच्यातर्फे विशाल सोनवणे यांनी युक्तीवाद केला. यात ते म्हणाले की, ठकसेन पाटील हे स्वत: वसंत सहकारी दुध उत्पादक सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. संस्थेतर्फे करण्यात आलेल्या दुधाच्या पुरवठ्याचा दाखला त्यांना ७ नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आला आहे. यात २०१९-२० या वर्षासाठी ८९७५१ लीटर, २१-२२- ४२६३८ लीटर याप्रमाणे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी दुध संघासाठी नामनिर्देशन पत्र भरले असता त्यांना कमी दुध पुरवठा असल्याचे कारण दाखवून पाटील यांचा अर्ज बाद करण्यात आला. यानंतर ठकसेन पाटील यांनी स्वत: संस्थेमध्ये तपासणी केली असता सन २०१९-२० या वर्षात १६१५२९ लीटर; सन २०२०-२१ वर्षात ८६९८४ लीटर, तर २०२१-२२ या वर्षात ८१०६० लीटर इतक्या दुधाचा पुरवठा करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर जिल्हा दुध संघात याबाबत ओरड केल्यानंतर त्यांना योग्य दाखला देण्यात आला.

या युक्तिवादावर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दुग्ध) सुरेंद्र तांबे यांनी निकाल देत ठकसेन पाटील त्यांचे नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरण्यात यावे असा निकाल दिला. यामुळे रावेरमधून जगदीश बढे यांच्या विरुद्ध ठकसेन भास्कर पाटील अशी लढत होणार आहे. अर्थात जगदीश बढे यांना बिनविरोध निवड करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी ठकसेन पाटील यांना खोटा दाखला देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप विशाल सोनवणे यांनी या युक्तीवादात केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!