भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात चोरट्यांची दिवाळी जोरात; एक दिवसाआड चोरी, पोलिसांना आव्हान !

मुक्ताईनगर, प्रतिनिधी– अक्षय काठोके : दीपावळीच्या पर्वावर तालुक्यात चोरटे उदंड झाल्याचे दिसून आले असून गेल्या २ आठवड्यात मोटरसायकल चोरी, घरफोडी, केबालचोरी, आणि ट्रान्सफर्मर मधील आईल चोरीच्या एकदिवस आड घटना घडल्या आहेत. दहा दिवसांत ६ गुन्हे पोलिसात दाखल झाले आहेत. तर २९ रोजी एकाच रात्री शहरात पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. एकंदरीत पोलीसच्या कार्यक्षमेतेला आव्हान देत चोरट्यानी घरफोडी, चोरीचे फटाके वाजविले आणि दीपावळी जोरात साजरी करीत नागरिकांना धास्तावले आहे.

एक दिवस आड चोरट्याचे फटाके..   १७ अक्टोबर दुई सुकळी शिवारात ३५ हजाराची केबल चोरी.
•  १८ अक्टोबर कर्की फाट्यावरून मोटरसायकल चोरी
  २० अक्टोबर पुनर्वसन क्षेत्रात खिडकीतून ६५ हजराचे दागिने लांबविले.
  २२-अक्टोबर सुकळी येथे घरफोडी ६० हजाराचे ऐवज लांबविले
  २४- अक्टोबर – शहरातील सिडफार्म येथून मोटारसायकल लांबविली
•  २६-२८ अक्टोबर दरम्यान ट्रान्सफर्मर फोडले ८ लाख ६५ हजाराचे तांबे व ऑइल चोरी
  २९ अक्टोबर शहरातील रेणुका नगर भागात पाच ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला.

मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या शी संपर्क साधला असता ते मेडिकल रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. तर पीएसआय शेवाळे यांच्याकडे चार्ज असून दुसरी कडे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील हजर झालेले नाहींत.

कुन्हा वडोदा उपसा सिंचन योजने साठी रिगाव शिवारात बसविलेल्या १०एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफार्मर वर चोरट्यानी हात साफ करीत तब्बल १लाख ६५ हजाराची तांब्याची कॉईल आणि सात लाख रुपये किंमतीचे ४५०० लिटर ऑइल असे आठ लाख ६५ हजार किंमतीचे साहित्य लांबविले आहे. कुन्हा वडोदा उपसा सिंचन योजने साठी रिगाव शिवारात ३३/६.६ क्षमतेचे खाजगी कंपनी मार्फत विजउपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रावर दोन १० एमव्हीए चे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे दिवाळी चा मुहूर्त साधत २६ ते २८ अक्टोबर दरम्यान चोरट्यानी उपकेंद्रावरील एका ट्रान्सफर्मर ला लक्ष केले.

अज्ञातचोरट्यांनी ट्रान्सफार्मरचे वरचे प्लेटला असलेले नट बोल्ट खोलुन त्यात असलेली तांब्याची कॉईल चोरुन नेली ट्रान्फार्मरच्या पश्चिम बाजुला असलेल्या कॉक ला पाईप लावुन ट्रान्फार्मर मधील साडेचार हजार लिटर ऑईल कॅन आणि टाक्यात भरून चोरुन नेले. घटनास्थळी चोरट्यानी वापरलेले एक फुटाचा लोखंडी पाईप २ इंच व्यासाचा तसेच ट्रान्फार्मरवर ४ ते ५ खाली गोणपाट (पोते) व एक ४ फुट लांबीचा लाकडी दांडा व तिन धारदार ब्लेड चाकु व ट्रान्फार्मरमध्ये साडीची सुतळी रंगीबेरंगी दोरी असे साहीत्य मिळुन आले आहे. या बाबत येथील पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!