उत्पादन शुल्क विभागाच्या जोडीला स्थानिक पोलीस सुद्धा आपले आर्थिक हितसंबंध जोपासाताहेत का? तापी काठच्या नागरिकांचा सवाल….
सावद ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| तापी नदी काठच्या गावांमध्ये अवैध धंदे बोकाळले. असे असताना मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जाते. त्या मुळे दारू विक्री विरोधात तासखेडा गावच्या महिलांनी एल्गार पुकारत सावदा पोलिस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला. गावातील दारू बंद झाली याचा राग मनात धरत गावात कौटुंबिक कलह मात्र वाढले. म्हणजे ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी गत या आक्रोश मोर्चाची झाली.
महत्वाचे म्हणजे दारूबंदीसाठी देण्यात आलेले निवेदन हे फक्त तासखेडा गावचे होते म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभाग थेट तासखेडा गावातच येवून पोहचते. निघुन जातांनाही सरळ निद्युन जाते. कार्यवाही होते ती फक्त तासखेड्याला मात्र इतर ठिकाणी सर्रास पणे होत असलेल्या दारू विक्री व्यवसायीकावर लक्ष का गेले नाही? लक्ष्य गेले नाही की आर्थिक हित संबंध सांभाळण्यासाठी लक्ष दिले गेले नाही ? नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
ज्या दिवशी तासखेडा येथे धाडसत्र सुरु होते त्या वेळेस रायपुर, उदळी येथील अवैध दारु व्यवसायिक नेहमी प्रमाणे कुठलाही धाक न बाळगता बिनधास्त दारूची विक्री करत होती. व आज ही करत आहेत. जसे तासखेडा येथेच शोध मोहीम राबवून गुन्हे दाखल करायात आले तसे रायपुर व उदळी या ठिकाणी करता आले नसते ? किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा असा कुठला नियम असेल की ज्या ठिकाणची तक्रार आली, त्याच ठिकाणी कारवाई करावी?
संबधीत बातमी वाचा : पो.स्टे.ला नवीन स.पो.नी रुजू होताच महिलांचा एल्गार,..आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या, संसाराची राख रांगोळी होण्यापासून वाचवा – महिलांचे अश्रू अनावर
उत्पादन शुल्क विभागाच्या जोडीला स्थानिक पोलीस सुद्धा आपले आर्थिक हितसंबंध जोपासतांना दिसत आहे जर असे नसते तर अदयाप एक तरी कार्यवाही झाली असती मात्र तसे झाले नाही. ही खंत ग्रामस्थांच्या मनात आहे. त्यातच नव्याने रुजू झालेले स पो निरिक्षक यांचे कडून बऱ्याचश्या इच्छा लावून धरल्या होत्या मात्र तापी परिसराचा पत्तांच माहीत नसावा किंवा त्यांना विसर पडला असावा या प्रकारावर आळा घालण्यासाठी, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
रायपूर अवैध दारू विक्रीचे माहेरघर
ज्या प्रकारे पुणे हे शिक्षणाचे माहेर घर बोलले जाते त्याच प्रकारे तापी परिसरातील रायपुर हे अवैध दारू विक्री व्यवसायांचे माहेर घर असल्याचे बोलले जाते. तुम्हाला पाहीजे ती दारू रायपुर येथे उपलब्ध असते. देशी – विदेशी अशी सर्व प्रकारची दारू ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाते.
संबधीत बातमी वाचा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची तासखेडा अवैध दारू वॉश मोहीम म्हणजे चंमकोगिरी ? उदळी, रायपूर येथील दारू विक्रेत्यांना अच्छे दिन…….भाग -१
रायपुर येथे दर आठवड्याला एक नविन अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरु केला जात आहे या साठी काहींनी घरच्या घरी विक्री करणे सोईचे समजून मोठ्या थाटा- माटात राजरोस पणे विक्री केली जात आहे हा संपूर्ण प्रकार बिट हवलदार यांना हाताशी घेवून केला जात असल्याचे नागरिकामधून बोलले जात आहे. आर्थिक लभापोटी त्यांना अवैध व्यवसाय दिसत नसावे असे बोलणे वावगे ठरणार नाही.
या सपूर्ण प्रकाराचा दोष राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे कारण जर त्या दिवशी तासखेडा च नव्हे तर संपूर्ण तापी परिसर पिंजून काढला असता तर या संपूर्ण प्रकाराला आळा बसला असता.प्रकाराला व्याळा बसला असता, मात्र आपले आर्थिक नुकसान कोण करून घेईल या विचाराने तक्रारीच्याच ठिकाणी धाड टाकून जनतेच्या नजरेत धुळ घालत शाबासकी मिळवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाने तर केले नाही ना? असे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे……….भाग – २
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा