भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग साठीचा कालावधी आणखी पुन्हा वाढवला

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मध्य-पूर्वेतील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे, अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

तीन दिवसांपूर्वीच पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवस केला होता. आता तो आणखी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान २४ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. म्हणजे आता तुम्हाला त्या आघी सिलिंडर बुक करता येणार नाही.

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत ११४.५ रुपयांची वाढ झाली आहे. हे नवीन दर 7 मार्चपासून लागू झाले आहेत. IOC च्या वेबसाइटनुसार मुंबईमध्ये नॉन-सब्सिडी एलपीजीची किंमत ९१२.५० रुपये झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!