मास्तर तुम्हीही : शाळा प्रवेशासाठी लाच, मुख्याध्यापक व उपशिक्षक एसिबी ए सी बी च्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दोन मुलांना शासन अनुदानित शाळेत प्रवेश देण्यासाठी इमारत निधीच्या नावाखाली श्री
शामलाल गुप्ता हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र कैलासप्रसाद मिश्रा वय ५६ वर्ष आणि उपशिक्षक दिनेशकुमार जमुनदास पांडे वय ५७ वर्ष यांनी १६ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील १० हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना सातपूर येथील श्री शामलाल गुप्ता हिंदी विद्यालयातील मुख्याध्यापक सुभाषचंद्र मिश्रा आणि उपशिक्षक दिनेशकुमार पांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाई मुळे याचं शाळेत प्रवेश प्रक्रियेत विविध माध्यमातून चाललेल्या आर्थिक व्यवहारांवर प्रकाश पडला आहे. अनेक असे प्रकार उघळकिस येणार.
तक्रारदार मूळचे बिहारचे हिंदी भाषिक आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमात शिक्षणात अडचण येत होती. त्यामुळे तक्रारदाराला मुलांना श्रमिकनगर येथील श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय या अनुदानित शाळेत प्रवेश घ्यायचा होता.तक्रारदाराची दोन मुले महानगरपालिकेच्या सातपूर येथील मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहेत.
त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापक सुभाषचंद्र मिश्रा, उपशिक्षक दिनेशकुमार पांडे यांना भेटून प्रवेश देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मुख्याध्यापक मिश्रा आणि उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी आठ हजार रुपये अशी १६ हजार रुपये इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली होती. त्याची कुठलाही पावती दिली जाणार नसल्याचे सूचित केले होते.
तक्रारदार यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.शनिवारी दि. ११ मे रोजी तक्रारदार मुलांच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा, उपशिक्षक पांडे यांना पुन्हा भेटले. त्यांनी इमारत निधीच्या नावाखाली १६ हजार रुपयांची मागणी केली होती. त्या १६ हजारपैकी १० हजार रुपये पहिला हप्ता म्हणून स्वीकारतना मुख्याध्यापक व शिक्षक या दोघांना पथकाने केली रंगेहात पकडले.
या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी,उपअधीक्षक विश्वजीत जाधव, हवालदार प्रणय इंगळे, सुनील पवार यांचा समावेश होता.