भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धुळे

आठवीच्या दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू, सहली दरम्यान घडलेली घटना

धुळे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सहलीला गेले असता पोहण्यासाठी गेलेल्या आठवीच्या दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. ही घटना धुळे तालुक्यातील निमडाळे येथे घडली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निमडाळे येथील जयहिंद शाळेच्या इयत्ता आठवीचा विद्यार्थी हितेश सूर्यवंशी पाटील व मयूर वसंत खोंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची वनभोजनासाठी सहल गेली होती. यावेळी परिसरात तलावासह खदान होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघे हितेश व मयूर हे तलावात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडायला लागले असता तेथील शिक्षकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. त्यात हितेश सूर्यवंशी-पाटील. वय १४ वर्ष. व मयूर वसंत खोंडे. वय १४, दोघे रा. ता. जि. धुळे. अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असून तेथील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दोघांना बाहेर काढून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!