शेठ ला.ना.सा.विद्यालयात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती तथा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे, जेष्ठ शिक्षक श्री.अशोक पाटील, सौ.जयश्री नेहते,श्री.हिम्मत काळे,सौ.मनीषा वानखेडे,ग्रंथपाल सहायक श्री.जावेद पटेल,प्रयोग शाळा सहायक श्री.गौरव देशमुख तसेच शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी शालेय ग्रंथालयात डॉ.अब्दुल कलाम लिखित वाचनीय प्रेरणादायी पुस्तके तसेच स्वामी विवेकानंद, म.गांधी,उद्योगपती टाटा,संस्कार कथा,शिवाजी महाराज कथा,पंचतंत्र कथा,निती कथा,विज्ञान कथा,बोध कथा, महामानव कथा आदी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.याचा लाभ शालेय विद्यार्थी घेत आहेत.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री.संजय भारुळे ,पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप,श्री.संजय वानखेडे सहायक ग्रंथपाल श्री.जावेद पटेल ,श्री.भगवान बारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.