भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

रणगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व समाज मिळून केली मोठ्या उत्साहात साजरी

तासखेडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यातील रणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या बाबात अधिक वृत्त असे की दि.१४ एप्रिल हा दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणुन संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवसाच औचित्य साधत रावेर तालुक्यातील रणगांव येथिल ग्रामस्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली .

या गावातील जयंती मागिल विशेष महत्व असे की रणगांव गावातील लोकसंख्या ही सुमारे पंधराशेच्या जवळपास आहे. आणि त्यात फक्त तिन घरे ही बौद्ध समाजाची आहेत. तरी मात्र गावातील सर्व समाजाची लोक गुण्या गोविंदाने गावात मिळून मिसळून रहात असल्याने संपूर्ण ग्रामस्थ मंडळी कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते . कारण तेथिल नागरिकांना हे माहीत आहे की बाबासाहेब हे एका विशिष्ट जाती धर्माचे नसुन संपूर्ण भारताचे आहे. एकीकळे आजही आपल्याला जाती व्देश सारख्या गोष्टी एकायला येत असतात अश्या जाती वाद्यांना चांगलीच चपराक रणगांव ग्रामस्यांनी लगावली आहे.

रणगाव या गावामंध्ये प्रत्येक जयंती, सण उत्सव हे एकोप्याने आणि गुण्या गोविदांने साजरे केली जातात. गेल्या चार वर्षा पासुन रणगांव गावचे विद्यमान उपसरपंच नामदेव रामा तायडे यांनी या कार्यक्रमाची सुरवात केली होती. आणि आज ही संपूर्ण गावामंध्ये मोठ्या उत्सहात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात आहे.

या दिवसाची दिनचर्या सकाळी सर्वप्रथम ग्रामपंचायत रणगांव मंध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुलहार अपर्ण केला जातो. त्या नंतर संध्यकाळी सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र जमुन बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलहार अपर्ण करून प्रार्थना घेतात व खिरदान करुन कार्यक्रमांची सांगता करतात. या कार्यक्रमा ठिकाणी रणगाव गावचे सरपंच संदिप मधुकर कोळी, उपसरंपच नामदेव रामा तायडे, धनश्याम बाबुराव, शालीक त्र्यंबक चौधरी, रमेश चुडामन चौधरी, धनंजय नामदेव कोळी, भगवान धोंडू सावळे, गजेन्द्र अमृत बावस्कर तसेच संपूर्ण ग्रामस्य मंडळी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रमाची सांगता करतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!