डॉ. महेश्वर रेड्डी यांचे कडून सावदा पोलीस स्टेशनचे पोलिस सुनील कुरकुरे यांचा सन्मान
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस सुनील जानकीराम कुरकुरे यांनी सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि विशाल पाटील यांचे मार्गदर्शनात एक गोपनिय गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. कुरकुरे यांच्या कार्याची दखल घेत सन्मान समारंभ. डॉ .महेश्वर रेड्डी साहेब (IPS), पोलीस अधीक्षक जळगाव, यांच्या शुभ हस्ते सुनिल जानकीराम कुरकुरे यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
या सन्मानाने सावदा पोलीस स्टेशनसह संपूर्ण विभागात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या कामगिरीने इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच पोलीस उप निरीक्षक गर्जे, पोलीस उप निरीक्षक बशीर तडवी तसेच सावदा पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार यांचे मनःपूर्वक आभार मानत एकता मित्र मंडळ फुलगांव , नातेवाईक मित्र परिवार विविध सामाजिक माध्यम गृपवर त्यांचे अभिनंदन होत आहे .
पोलीस विभाग जळगांव यांनी माझ्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला निश्चित अधिक कार्यप्रवण होण्यासाठी मला बळ मिळाले आहे असे मत सन्मानार्थी सुनिल कुरकुरे यांनी व्यक्त केले .