भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

पशुवैद्यकीय क्षेत्रातील आधारवड ज्येष्ठ नेते डॉ. नारायण जोशी यांचे निधन

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आणि पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. नारायण जोशी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून एक जिद्दी व समर्पित नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


डॉ. जोशी यांनी आपल्या कार्यकाळात पशुवैद्यकीय पदविकाधारकांना समाजात योग्य स्थान मिळावे, तसेच त्यांच्या सेवेला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी संघटनात्मक पातळीवर सातत्याने प्रयत्न केले. विविध प्रशासकीय स्तरांवर पाठपुरावा करत त्यांनी पदविकाधारकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली. वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्राशी असलेला आपला संपर्क कायम ठेवत सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या चळवळीला बळ देण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.


त्यांच्या निधनाने पशुवैद्यकीय क्षेत्राचा एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत असून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, जळगाव जिल्हा यांच्या वतीने डॉ. नारायण जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!