भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर शहरामध्ये पिण्याचे पाण्याचे नमुने दूषित ; आजाराला निमंत्रण

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी :  मुक्ताईनगर शहराला पूर्णा नदीचे पात्रातून पाणीपुरवठा होत असतो.  पूर्णा नदी ही गाळ वाहून नेणारी नदी असून पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्ये सालाबाद प्रमाणे शहरवासीयांना  दूषित व गढूळ पाणीपुरवठा चा सामना करावा लागतो. मागील महिन्यामध्ये मुक्ताईनगर येथील दोन भागातील पिण्याचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य आलेले होते. तात्काळ अयोग्य आलेले पिण्याचे पाण्याचे नमुने पुन्हा री सॅम्पल  पाठवून जळगाव येथे पाणीपुरवठा रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्यानंतर ते पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

मुक्ताईनगर नगरपंचायती मधील पाणीपुरवठा अभियंता गेल्या दहा महिन्यापासून नसल्याने हा पदभार लेखापाल हे सांभाळत आहेत.आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करीत शहरात पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन अनुजैविक तपासणी करावी व बॅक्टेरिअल इन्फेक्शन  करुन गुणवत्ता तपासणी करावी व जे स्रोत दूषित आहेत त्यांचे क्लोरिनेशन करावे जेणेकरून मुक्ताईनगर वासियांना पिण्यायोग्य पाणी मिळेल.

मुक्ताईनगर शहरवासीयांना मुक्ताईनगर जवळ असलेल्या पूर्णा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत असून सालाबाद प्रमाणे मुक्ताईनगर वासियांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असतो. मे महिन्यामध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर , सीड फॉर्म, आसिफ बागवान त्यांचे घराजवळील पिण्याचे पाण्याचे नमुने तीन मे रोजी दूषित  म्हणजे पिण्यास अयोग्य आलेले होते.

तसेच नऊ मे रोजी अल्फलाह उर्दू हायस्कूल परिसर , मस्तान कुरेशी यांचे घराच्या जवळील पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य  आले होते. दोघं ठिकाणचे पिण्याचे पाण्याचे नमुने नंतर नगरपंचायत विभागाने री सॅम्पल घेऊन जळगाव येथे पाठवले होते नंतर हे नमुने पिण्यास योग्य आलेले होते. जळगाव येथील पाणीपुरवठा रासायनिक प्रयोगशाळेत भेट दिली असता तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले पिण्याचे  पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य  येताच आम्ही तात्काळ नगरपंचायतीला ईमेलद्वारे कळवतो असे सांगितले.

महिन्याभरात वीस नमुने पाठवले जातात– शहरातील विविध भागातून चार नमुने आठ दिवसात जळगाव येथे रासायनिक पाणीपुरवठा प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. एखाद्या वेळेस पिण्याचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य येतात. त्यावेळेस तात्काळ नगरपंचायत पाणीपुरवठा विभाग पाण्याचे री सॅम्पल घेऊन पाठवतात. एखाद्या वेळेस या प्रक्रियेमध्ये  सुट्टी आल्यास दोन-तीन दिवसाचा कालावधी जातो. या कालावधीमध्ये त्या परिसरातील नागरिक अशुद्ध पाणी पितात. यामुळे डायरियाची लागण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!