भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभडगाव

पोलिस ठाण्यात दारुड्यांचा धिंगाणा, शिवीगाळ करत चक्क पोलिसांच्याच लगावली कानशिलात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सार्वजनिक जागेवर भांडण करीत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भडगांव पोलिस स्टेशनला आणले. मात्र पोलीस स्टेशन मध्येच या तीन मद्य पिलेल्या व्यक्तींनी गोंधळ घालत
पोलिसाना अश्लील शिवीगाळ करून चक्क गणवेशाची कॉलर पकडत पोलिसाला कानशिलात मारली. तसेच खुर्चीची मोडतोड केली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव पोलिसाना शहरात दि. २९ जून रविवार रोजी संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास पाचोरा चौकात दत्त पान सेंटर जवळ काही लोकांचे भांडण सुरु असून गर्दी जमली असल्याबाबत माहिती मिळाली. त्या नुसार पोलिसांनी भांडण करणाऱ्या राजेंद्र रमेश खैरे (वय ३६), विक्की रमेश सोनवणे (वय २८), प्रतीक मार्कंड सोनवणे (वय १९, तिन्ही रा. यशवंत नगर, भडगाव) या तीन जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. हे तिघे जण दारू पिलेले होते.

या तिघांची अधिक चौकशी करीत असताना त्या पैकी दारूच्या नशेत असलेल्या राजेंद्र रमेश खैरे वय ३६ वर्ष. याने पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील यांना अश्लील शिवीगाळ करून गणवेशाची कॉलर पकडून कानशिलात लगावली. पोलीस कर्मचारी मंगल गायकवाड आणि विजय जाधव हे पोलिस कर्मचाऱ्यांना आवरायला गेले असता आरोपी विक्की सोनवणे व प्रतीक सोनवणे यांनी त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्यांचा गोंधळ सुरूच होता. तसेच बारनिशी कक्षात आरोपी राजेंद्र खैरे याने खुर्ची जोरात आपटून मोडतोड केली. याबाबत पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!