सर्व्हर डाऊन मुळे राज्यभरातील मोफत धान्य वाटपाचे काम ठप्प
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रेशनिंग प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील शिधापत्रिकाधारकांना चार दिवसांपासून रेशन मिळणे बंद झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व्हरचा लपंडाव सुरू असल्याने रास्त धान्य दुकानातून रेशन देणे जवळपास ठप्प झाले आहे. मोदी सरकारने देशभरातील गरीब कुटुंबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना आणखी पुढे पाच वर्ष वाढविण्यात आली आहे. त्या प्रमाणे सर्व स्वस्त धान्य दुकानांवर शासनाकडून मोफत धान्य दिले जातं आहे.
रेशन दुकाने आता ऑनलाईन झाल्याने लाभधारकांना धान्य पास मशीनवर पासिंग केल्या शिवाय धान्य दिले जातं नाही. परंतु सर्व्हर लपंडाव खेळत असून दिवसातून अनेक वेळा सर्व्हर डाऊन होत असल्याने रेशन वाटपाचे काम पूर्णपणे थांबले आहे.