भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयसामाजिक

६५ वर्षाच्या काळात देशात हिंदूंच्या संख्येत घट, ऐन निवडणुकीच्या काळात अहवाल समोर आल्यानं राजकारण तापलं

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क . ६५ वर्षाच्या काळात देशात हिंदूंच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल ऐन निवडणुकीच्या काळात समोर आल्यानं राजकारण तापलं आहे. देशामध्ये मागच्या ६५ वर्षात हिंदुंची लोकसंख्या ८ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर याच काळात मुस्लिमांची लोकसंख्या मात्र ९.८४ टक्क्यांवरुन १४.९ टक्क्यांपर्यंत गेली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या रिपोर्टमधून ही माहिती पुढे आलीय. यामध्ये पारशी आणि जैन समूहाला सोडून देशातल्या सर्व धार्मिक अल्पसंख्यकांची लोकसंख्या एकूण ६.५८ टक्के वाढली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० ते २०१५ यामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. बहुसंख्यक असलेल्या हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लिमांची लोकसंख्या ओव्हरऑल ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे.

१९५० मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ९.८४ टक्के इतकी होती. आता हीच टक्केवारी १४.९ पर्यंत जावून पोहोचली आहे. तर ईसाई धर्माच्या लोकांची संख्या २.२४ टक्क्यांवरुन २.३६ टक्के इतकी झाली आहे. याप्रमाणेच शीख धर्मियांची लोकसंख्या १.२४ टक्क्यांवरुन १.८५ टक्के झाली आहे.

६५ वर्षात कोणत्या धर्माची लोकसंख्या वाढली-घटली?
रिपोर्टमधील आकडेवारीनुसार १९५० मध्ये भारतात हिंदू लोकसंख्या ८४.६८ टक्के इतकी होती. या टक्केवारी आता घट झाली असून २०१५ मध्ये ७८.६ टक्के हिंदूंची लोकसंख्या झाली आहे. याचवेळी मुस्लिम लोकसंख्या ९.८४ वरुन १५.९ टक्के झाली आहे.

स्वातंत्र्याच्या तीन वर्षांनंतर ईसाई समाजाची देशातील लोकसंख्या २.२४ टक्के होती ती २०१५ मद्ये २.३६ टक्के झाली आहे. १९५० मध्ये शीख लोकसंख्या १.२४ टक्के होती, यात वाढ होऊन २०१५ मध्ये १.८५ टक्के झाली आहे.

तर बौध्द धर्मियांची संख्यादेखील वाढली आहे. १९५० मध्ये बौद्धांची लोकसंख्या ०.०५ टक्के होती आता २०१५ मध्ये ०.८१ टक्के अशी वाढ झाली आहे. जैन समाजाची लोकसंख्या ०.४५ टक्के इतकी होती आता त्यामध्ये घट होऊन २०१५ मध्ये ०.३६ टक्के इतकी झाली आहे. यासोबत पारशी लोकसंख्या ०.०३ टक्क्यांवरुन घसरुन ०.००४ टक्के इतकी झाली आहे.

धार्मिक लोकसंख्येवर कोणाचा रिपोर्ट?
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईसी-पीएम) आपल्या रिपोर्टमधून धार्मिक लोकसंख्येची माहिती दिली आहे. ईसी-पीएमचे सदस्य शमिका रवी, ईसी-पीएमचे कन्सल्टंट अपूर्व कुमार मिश्रा आणि ईसी-पीएमचे प्रोफेशनल अब्राहम जोस यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. देशात सामाजिक विविधता वाढण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!