राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेत आ. एकनाथ खडसेसह आ. लंकेचे सरकार टीकास्त्र
ऐनपूर/मुक्ताईनगर मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या बविसाव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील सांगवे, विटवे, निंबोल, एनपुर येथे ग्रामस्थांसमवेत संवाद साधला एनपुर येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे, पारनेर चे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची जाहीर सभा पार पडली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, रोहिणी खडसे खेवलकर यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे,निवृत्ती पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अल्पसंख्याक सेल एजाज मालिक, माजी जि प सदस्य रमेश नागराज पाटील, प स समिती सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, युवक उपाध्यक्ष पवन पाटील, रावेर शहराध्यक्ष मेहमूद भाई, अतुल पाटील, काशिनाथ महाजन, सरपंच अमोल महाजन, किशोर पाटील, माया बारी, विकास पाटील, रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी रोहिणी खडसे ह्या म्हणाल्या गेल्या तिस वर्षेपासून एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. काही लोकांनी केलेल्या विश्वासघातकी कृत्यामुळे माझा थोड्या मतांनी पराभव झाला परंतु नव्वद हजार मतदारांनी मला निवडून दिले त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हि जनसंवाद यात्रा काढली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर म्हणाल्या, मुक्ताईनगरचे आमदार हे राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर निवडून आले. निवडून आल्यावर त्यांनी रंग बदलवत शिवसेनेला पाठींबा दिला तिथं पण त्यांचे मन रमले नाही ठाकरेसाहेबांची साथ सोडून शिंदे गटात गेले. पन्नास खोके घेऊन त्यांचे सब कुछ ओके सुरू असून जनतेला त्यांनी व सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य सरकारवर टिका करताना लंके म्हणाले राज्य सरकारबाबत बोलायलाच नको, हे राज्य सरकार फक्त जाहिरात बाजी आणि पोस्टरबाजीवर चालते, अशी जोरदार टीका त्यांनी केली
माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले कि, गेले तिस वर्ष जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले त्या जोरावर तुम्ही मला निवडून दिले. विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काही ना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.
राणांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करण्याचं आव्हानच दिलं आहे. बच्चू कडू यांनी आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून पुरावे नाही दिले तर निर्णय घेण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी एकप्रकारे सरकारलाच आव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा एकनाथराव खडसे यांनी केला.