ई “`- पीक पाहणीला मुदत वाढ! पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l ई-पीक पाहणीला राज्यात खरीप हंगाम सन २०२४ -२०२५ साठी १ सप्टेंबर पासून नोंदी सुरू करण्यात आल्या होत्या. तर दी. १५ सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करीत उपलब्ध होती.१५ तारखे पर्यंत पीक नोंदणीची मुदत होती. परंतु बहुतेक ठिकाणी राज्यात मुसळधार पावसाने शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण होऊ शकली नाही.तसेच राज्यात योग्य प्रचार व प्रसार न झाल्याने पिकांची नोंद अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे.
त्या मुळे खरीप हंगाम सन २९२४ करीता पुन्हा ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्थरावरील ई पीक नोंदणीची मुदत देण्यात आली आहे.तसेच सहायक व तलाठी स्तरावर पीक पाहणी ची मुदत दिनांक २४-९-२०२४ ते २३-१०-२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.बतरी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत करून घ्यावी असे कळविण्यात आले आहे.
या बाबत योग्य प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यां मार्फत जास्तीत जास्त ई पीक पाहणी नोंदणी बाबत योग्य ती कारवाई करावी असे आवाहन शासनाकडून साचींद्रा प्रताप सिंग यांनी केले आहे.