नाशिक

नाशिक मध्ये भूकंपाचे धक्के, परिसरात भीतीचे वातावरण

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी नाशिक मधून समोर आली आहे. नाशिक मध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक पासून जवळ जवळ ३० किलोमीटर अंतरावर नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात पुन्हा भूकंप धक्के जाणवले आहेत. हा भाग नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुके आहेत. २.४ आणि ३.३ रिश्टर स्केलमध्ये भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.या घटनेत अद्याप कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती आहे. सतत बसणाऱ्या हादऱ्यानी धास्ती वाढली आहे.

गत महिन्यात २४ डिसेंबर आणि २  जानेवारीला पेठ, हरसुलमध्ये दोन वेळा भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पेठ, हरसूल, सुरगाणामधील अनेक गावांना रात्री जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसत असल्याने वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. वारंवार भुकंपाचे धक्के बसत असल्याने याबाबतचा अभ्यास करण्यासाठी नागपूर येथील जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे भुगर्भशास्त्रज्ञ हर्षराज वानखेडे नाशिकमध्ये आले होते.

सतत जमिनीखाली होणाऱ्या हालचालीमुळे हे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच भूगर्भ शास्त्रज्ञाचे मत असून
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुके म्हणून पेठ, हरसूल, सुरगाणा हा परिसर ओळखला जातो. अचानक धक्के जाणवू लागल्याने या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत अद्याप कोणतीही हानी न झाल्याची माहिती आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!