भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगावराजकीय

राष्ट्रवादी खडसेंच्यापाठीशी : ईडीकडून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न– जयंत पाटील

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चाळीसगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे हे सर्व जगजाहीर आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

चाळीसगावमधील नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ED, CBI या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून आज चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी मराठवाडा आणि खानदेशात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्‍याच गावांमध्ये पूराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!