माजी मंत्री एकनाथ खडसेना ED ची नोटीस, जप्त मालमत्ता खाली करण्याचे आदेश !
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसें यांच्यासह चौघांना ईडीने ‘पीएमएलए’ अंतर्गत जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याचे आदेश आता ईडीकडून देण्यात आले आहे. ईडीने नोटीसद्वारे एकनाथ खडसे यांना आदेश दिले आहे.
- मोठा बातमी : मुक्ताईनगर बाजार समिती नव्याने स्वतंत्रपणे स्थापनेचा शासन निर्णय,बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन
- अखेर “तो” नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
- “त्या ” दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची एलसीबीतून उचलबांगडी
देशात सर्वत्र इडीची सीडी वाजत आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आली आहे. तसेच पडसाद राज्यातदेखील उमटत असून महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथराव खडसे यांची भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी देखील केली असून नोटीस देखील बजावली होती. दरम्यान, ईडीने पुन्हा एकनाथराव खडसेंसह चौघांना नोटीस बजावली आहे. खडसेंच्या ११ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित मालमत्ता नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत रिकाम्या करण्यात याव्यात, असे आदेश संबंधित मालमत्तांच्या मालकांना देण्यात आले आहेत. तसे न झाल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या करण्याचा अधिकार संचालनालयाकडे असेल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. खडसेंना ३० मे रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळामध्ये खडसेंची मालमत्ता आहे. ही मालमत्ता खाली करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. येत्या १० दिवसांमध्ये मालत्ता खाली करण्यास सांगण्यात आले आहे.